Sun. May 16th, 2021

पुलवामा हल्ल्यावरून नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका

काही मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतर आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि काँग्रेसकडे पुन्हा सत्ता देऊन काय फायदा असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांची विदर्भातील पहिली सभा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे झाली. ते रामटेक चे शिवसेना उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी आले होते. शिवसेनेच्या कोट्यात विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघ आहेत.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला व विदर्भ दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.’देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जिंकायचं आहे’ असं ही ते म्हणाले.पुलवामा हल्ल्यावरून शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

काही मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतर युती करण्यात आली.
‘काँग्रेसकडे पुन्हा सत्ता देऊन काय फायदा ?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
पुलवामा हल्ल्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जिंकायचं आहे’ असं  ही ते म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांची साथ कधीच सोडणार नाही.
‘प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत केंद्र हवं त्यासाठी प्रयत्न करु
‘शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास युती सरकार वचनबद्ध राहील.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *