Sat. Jul 31st, 2021

राम मंदिर कधी उभारताय ? तारीख सांगा – उद्धव ठाकरे

पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, वारंवार येत राहणार असे सांगत अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे, त्यामुळे राम मंदिर कधी बांधणार आहात, याची तारीख सांगून टाका, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जावून भाजपला प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरे हे 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर पोहोचले असून झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हटलं आहे.

मी राजकारण करण्यासाठी अयोध्येत आलो नाही. तर प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. राम मंदिरासाठी किती वर्ष वाट बघणार. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिर कधी बांधणार यासाठी एकदाची तारीख जाहीर करून टाका, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. राम मंदिरासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढणार असेल तर त्याला शिवसेनेचे नक्कीच समर्थन देणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिर बांधण्याचे मला श्रेय नको. राम भक्त म्हणून मी दर्शनासाठी येईल. राम मंदिराच्या प्रश्नावर हिंदू आता शांत बसणार नाही, असेही उद्धव यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे आज अयोध्येत सह परिवार पोहोचले. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे सोबत आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव यांचे शिवसेनेकडून जंगी व पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्धव यांनी साधू संताची भेट घेतली. त्यानंतर परिवारासह लक्ष्मण किलाचा दौरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *