Wed. Dec 1st, 2021

‘तो’ व्हिडिओ पाहून उदयनराजेंचे अश्रू अनावर

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची वेगळी बाजू सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. आतापर्यंत त्यांचा आक्रमकपणा, टीकांना प्रत्युत्तर देताना अशा अनेक बाजू लोकांसमोर आल्या आहेत. मात्र उदयनराजे चक्क भावुक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांनी खास त्यांच्यासाठी तयार केलेला व्हिडिओ पाहून ते भावुक झालेले दिसत आहेत.

कार्यकर्त्यांनी ‘आले रे, आले रे उदयनराजे’ या गाण्यावर हा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडीओ पहाताना  उदयनराजेंसह कार्यकर्तेही भावुक झाल्याचे दिसत आहे. हे गाणं ऐकताना उदयनराजेंचे अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *