Jaimaharashtra news

उल्हासनगरमधील पाच मजली धोकादायक इमारत कोसळली

उल्हासनगरमध्ये पाच मजली धोकादायक इमारत पडल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जीविहानी झालेली नाही. रविवारी या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी  इमारत खाली करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी ठळल्याचे समजते आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास इमारत कोसळ्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्थलांतर झालेल्या रहिवाशांचे मौल्यवान वस्तू घेण्यापूर्वीच इमारत पडल्यामुळे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 2 येथील 5 मजली महेक इमारत कोसळली आहे.

मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यामुळे रविवारी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील 31 कुटुंबांना बाहेर काढले.

मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे.

स्थलांतर केलेल्या रहिवाशांना आपले सामान घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती.

मात्र त्यापूर्वीच इमारत कोसळल्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

.

Exit mobile version