Wed. Jan 19th, 2022

आधी मतदान, मग लग्न; उल्हासनगरमध्ये तरुणीने लग्न करण्यापूर्वी केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या देशात चौथा तर राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असून नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. देशातील ९ राज्यात ७१ जागांवर मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात १७ मतदारसंघात मतदान होत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर येथे लग्न बंधनात अडकण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. साहिली रणपिसे असे या तरुणीचे नाव असून तिने लग्न करण्यापूर्वी मतदान केले आहे.

आधी मतदान, मग लग्न –

महाराष्ट्रात १७ मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

कल्याण मतदारसंघातील उल्हासनगर येथे एका तरुणीने लग्न करण्यापूर्वी मतदान केले आहे.

आधी मतदान आणि मग लग्न करणार असे या तरुणीने म्हटलं आहे.

साहिली रणपिसे असे या तरुणीचे नाव आहे.

उल्हासनगरमधील उल्हास विद्यालयमध्ये तिने मतदानाचा हक्क बजावला आहे.

देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे तिने यावेळी आवाहन केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *