Sat. May 25th, 2019

उल्हासनगर पोलिसांनी एकाच दिवशी केला 3 गुन्ह्यांचा तपास

0Shares

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोटरसायकल-टेम्पो-मोबाईल चोरीच्या 3 गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे. तसेच पोलिसांनी सुमारे 5 लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

यामध्ये 2 अल्पवयीन मुलांसोबत इतर सहकार्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

मोबाईल, टेम्पो व मोटरसायकल चोरीच्या घटना विठ्ठलवाडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीती घडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पोलीस आरोपींच्या मागोवा घेत होते.

त्यावेळी यातील आरोपींची माहिती त्यांना मिळत गेली.  यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून त्वरीत कारवाई केल्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यात यश मिळाले.

पोलिसांनी रचला सापळा

विठ्ठलवाडीच्या हद्दीतील पावणे दोन लाख किमतीचा मोबाईल चोरणारा चोर, 17 सेक्शन येथील मोबाईल बाजारात येणार होता.

अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

या कारवाईत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सिद्धार्थ गायके उर्फ ताराचंद हा अंबरनाथच्या मोरीवली भागात चोरीच्या टेम्पोचा नंबर बदलण्यासाठी आलेल्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सम्राट अशोक नगरात राहणाऱ्या अमित कोतपिल्लेला पकडले.

त्याने एका विधी संघर्षीत बालकाच्या मदतीने 3 स्कुटर आणि 1 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले की, अशा प्रकारे एकाच दिवसात 3 गुन्ह्यांचा तपास यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, वसंत पाटील, रमजू सौदागर, सुरेंद्र पवार, आर. टी. चव्हाण, भरत नवले, संजय माळी, रामदास मिसाळ, रामदास जाधव, विश्वास माने, जावेद मुलानी, विठ्ठल पदभेरे, बाबूलाल जाधव, योगेश पारधी या पोलिसांच्या टीमने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *