Sun. Sep 19th, 2021

क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली. नागपुरातील उच्चभ्रु शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.

 

चोरट्यांनी उमेशच्या घरातून सुमारे 45 हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन लंपास केला. चोरीची घटना घडली तेव्हा उमेश यादव कुटुंबासोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता.

 

घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर उमेद यादवने पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *