Mon. Dec 6th, 2021

UNने कॉंग्रेसला विचारुन मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवायचे का ? – मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केल्यानंतरही कॉंग्रेसला प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच मसूदला निवडणूकीच्या काळातच आंतरराष्ट्रीय दहशतवादी का घोषित केले असे प्रश्न कॉंग्रेस उपस्थित केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

राजस्थानमध्ये झालेल्या सभेत मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

भारतात अनेक हल्ले घडवणारा आणि जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी कॉंग्रेस स्वत:ची खिल्ली उडवून घेत आहे.

निवडणुकीच्या काळातच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला ?

मात्र मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे हा मोदींच्या कॅबिनेटचा निर्णय आहे का ? असा टोला नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.

तसेच संयुक्त राष्ट्राने कॉंग्रेसला विचाररयला हवं होतं की,  तुम्ही ज्यांना साहेब म्हणतात त्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करु का ?

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे तुमची काही समस्या नाही ना ? असे प्रश्न संयुक्त राष्ट्राने कॉंग्रेसला विचारावे.

सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *