Sun. May 16th, 2021

पोलिसाचं काम, छोकरी मिळावी म्हणून नोकरीला रामराम!

एक चांगली नोकरी असली, की लाईफ सेट असा आपला विचार असतो. एकदा नोकरी लागली आणि त्यातूनही सरकारी, तर एक चांगली मुलगी पाहून विवाह करायचा आणि सुखाने संसार करायचा, असं स्वप्न अनेकांचं असतं. पण सरकारी नोकरी लागल्यावर ती नोकरीच विवाहात अडचण ठरायला लागली तर? असाच प्रश्न भेडसवायला लागला तो एका पोलीस कॉन्स्टेबलला, अखेर लग्न करता यावं, म्हणून त्याला आपली नोकरी सोडावी लागली.

पोलिसांचं काम म्हणजे किती मेहनतीचं हे आपण पाहतोच. 24 तास ड्युटी, सुट्टीची हमी नाही, कुठले सणवार साजरे करायला घरी थांबायला मिळत नाही. अशावेळी पोलीस करणार तरी काय?

राजीनाम्यास कारण की…

हैद्राबाद येथील चारमिनार पोलिस स्टेशनमधील सिद्दांथी प्रताप या 29 वर्षीय कॉन्स्टेबलने राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यामध्ये सिद्दांथीने लिहिले आहे की, इंजिनिअरिंगच्या ग्रेजुएशननंतर 2014 मध्ये तो पोलिसात भरती झाला.

त्याच्या नोकरीला पाच वर्ष झाली तरी त्याला एकही प्रमोशन मिळाले नाही.

SI, ASI या वरील पोस्ट असणाऱ्यांनाच लवकर प्रमोशन मिळतं आणि त्यांनाच अनेक सुविधाही मिळतात.

पण कॉन्स्टेबल म्हणुन काम करणाऱ्या अनेक पोलिसांना 30-40 वर्षानंतरही प्रमोशन मिळत नाही.

अखेर त्याच पोस्टवर राहून निवृत्त व्हावं लागतं.

त्यात 24 तास ड्युटी करावी लागते, आठवड्यात एकही सुट्टी नाही. कुटुंबासाठी वेळ देता येत नाही.

या कारणांमुळे लग्नातही अडचणी येत होत्या.

लग्नासाठी मुलींकडून नकार येत होते.

अखेर हेच कारण देत सिद्दांतीने राजीनामा दिला आहे. बऱ्याचदा नोकरी मिलाली की लग्न होणं सुलभ होऊन जातं. मात्र पोलिसांच्या नोकरीमध्ये असणाऱ्या अनेक अडचणींपैकी नोकरी हिच लग्न आणि संसारासाठी अडचण ठरू लागली आहे, हे भीषण वास्तव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *