Thu. Mar 21st, 2019

असं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक

0Shares

मोबाईलवरून चॅटींग करायचं, व्हीडीओ काॅलिंग किंवा शुभेच्छा द्यायचं म्हणा व्हॉट्सअॅप हे गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने प्रसिद्ध झालं आहे. हे अॅप वापरणारे जवळपास 20कोटींहून अधिक भारतीय आहेत. त्यामुळे हे अॅप प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

एखाद्या व्यक्तीशी पटत नसेल किंवा भांडण झालेले असेल तर आपण त्याच्यापासून लांब राहण्याचा पर्याय निवडतो. मग ते मित्र असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड. मात्र जर तो व्यक्ती व्हॉट्सअॅपवर असेल तर त्याला ब्लाॅक केले जाते. अशावेळेस ब्लाॅक केलेला व्यक्ती जोपर्यंत अनब्लॉक करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चॅट करणं कठीण होऊन जाते.

यावर एक नवी शक्कल लढवली आहे. असं जर कोणी केलं तर ‘ही’ एक नवी आयडिया वापरा आणि स्वत:ला अनब्लाॅक करा.

अनब्लॉक करण्याची आयडिया – 

  • सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या सेटींग्जमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करा.
  • डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा आणि नंतर आपला नंबर टाका.
  • नंबर टाकल्यावर आपलं अकाऊंट डिलीट करा.
  • त्यानंतर व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइंस्टॉल करा.
  • अनइंस्टॉल केल्यावर फोन रिस्टार्ट करा.
  • पुन्हा प्ले स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप इंस्टॉल करा आणि पूर्ण माहिती टाका.
  • आता तुम्ही स्वत:ला आपल्या फ्रेंडच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून अनब्लॉक केलंय.

परंतू हे करण्याआधी सुनिश्चित करा की नक्की तुम्हाला ब्लॉक केलंय का?

ब्लाॅक केलं असेल तर असं तपासा –

  • समोरच्याने ब्लॉक केल्यावर आपल्याला त्याचा डीपी, स्टेटस, फोटो, लास्ट सीन काहीच दिसत नाही.
  • ज्याने ब्लॉक केलंय असं तुम्हाला वाटतंय त्याला काहीतरी मेसेज पाठवा.जर एकच टिक दिसत असेल तर समजून जा त्याने तुम्हाला ब्लॉक केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *