Jaimaharashtra news

Under 19 World Cup 2020, : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मंगळवारी रंगणार सेमीफायनल

अंडर १९ वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान ( team india vs pakistan semi final ) यांच्यात मंगळवारी ४ फेब्रुवारीला सेमी फायनल मॅच खेळण्यात येणार आहे.

हा सामना पोचेफस्ट्रूममध्ये येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली. तसेच पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकटने पराभव करुन सेमी फायनलमध्ये धडक मारली.

यामुळे या दोन्ही टीममध्ये सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. ही सेमीफायनल या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल मॅच असणार आहे.

तर दुसरी सेमी फायनल बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात ६ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.

असा आहे इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील रेकॉर्ड

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण ९ वेळा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाला ४ सामने जिंकण्यास यश आले आहे. तर ५ सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

उभय संघातील ९ सामन्यांचा निकाल

अंडर – 19 वर्ल्ड कप 1988 -: पाकिस्तान 68 धावांनी विजयी

अंडर – 19 वर्ल्ड कप 1998 -: टीम इंडियाचा 5 विकेटने विजय

अंडर – 19 वर्ल्ड कप 2002 -: पाकिस्तानचा 2 विकेट्सने विजय

अंडर – 19 वर्ल्ड कप 2004 -: सेमीफायन मॅचमध्ये पाकिस्तानचा टीम इंडियावर 5 विकेट्सने विजय

अंडर -19 वर्ल्ड कप 2006 -: अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 38 धावांनी विजय, पाकिस्तान ठरला विश्वविजेता

अंडर -19 वर्ल्ड कप 2010 -: क्वार्टरफायनल मॅचमध्ये पाकिस्तानचा 2 विकेटने विजय

अंडर -19 वर्ल्ड कप 2012 -: क्वार्टरफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवर 1 विकेटने रोमहर्षक विजय

अंडर-19 वर्ल्ड कप 2014 -: टीम इंडियाचा 40 धावांनी विजय

अंडर-19 वर्ल्ड कप 2018 -: सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर 203 धावांनी विजय

या सेमीफायनल सामन्यासाठी दोन्ही संघांनी नेट्समध्ये कसून सराव केला आहे.

टीम इंडिया : प्रियम गर्ग ( कॅप्टन ), यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, अंथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, विद्याधर पाटील, शुभांग हेगडे, शाश्वत रावत आणि कुमार कुशाग्र

टीम पाकिस्तान: रोहित नजीर (कॅप्टन), हैदर अली, मोहम्मद हुरैरा, फहाद मुनीर, कासिम अकरम, मोहम्मद हारिस, इरफान खान, अब्बास अफरीदी, ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान, मोहम्मद वसीम जूनियर, अब्दुल बंगालजई, मुहम्मद शहजाद आणि आरिश अली खान

Exit mobile version