Sat. Oct 1st, 2022

Under 19 World Cup : टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कॅप्टन

बांगलादेशने टीम इंडियाचा अंतिम सामन्यात ३ विकेटने पराभव केला. यासह बांगलादेशने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी १७८ धावांचं आवाहन दिलं होत. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशला १७० धावांचे सुधारित आव्हान मिळाले.

हे आव्हान बांगलादेशने ७ विकेट गमावून पूर्ण केलं.

टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले असले तरी टीम इंडियाच्या नावावर एक रेकॉर्ड अबाधित आहे.

अंडर-१९ वर्ल्ड कप सर्वाधिक वेळा जिंकण्याचा बहुमान टीम इंडियाकडेच आहेच.

टीम इंडियाने आतापर्यंत ४ वेळा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कर्णधारांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

टीम इंडियाने आतापर्यंत ४ वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

टीम इंडियाने ३ वेळा प्रथम बॅटिंग करताना तर एकदा प्रथम बॉलिंग करताना वर्ल्ड कप जिंकला आहे.

२००८ च्या वर्ल्ड कपचा अपवाद वगळता टीम इंडियाने तीनही वर्ल्ड कप प्रथम बॅटिंग करतानाच जिंकले आहेत.


मोहम्मद कैफ – २०००

टीम इंडियाला पहिल्यांदा २००० साली मोहम्मद कैफ याने वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करुन या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं.

India U19 cricket team, Yuvraj Singh

टीम इंडियाचा या अंतिम सामन्यात ६ विकेट आणि ५६ बॉल शिल्लक ठेवून श्रीलंकेवर विजय मिळवला होता.

विराट कोहली – २००८

यानंतर पुढील वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारताला ८ वर्षांची वाट पाहावी लागली. विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २००८ साली अंडर – १९ वर्ल्ड कप जिंकवून दिला.

Image result for u 19 world cup 2008 win team india

टीम इंडियाचा या अंतिम सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार १२ धावांनी विजय झाला होता.

टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

उनमुक्त चंद – २०१२

टीम इंडियाने ४ वर्षांनी म्हणजेच २०१२ साली पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटने पराभव केला होता.

Image result for u 19 world cup 2012 win team india

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी २२६ धावांचं आव्हान दिलं होतं.

टीम इंडियाने हे विजयी आव्हान ४ विकेटच्या मोबदल्यात पार केलं. कॅप्टन उनमुक्त चंद याने फायनलमध्ये नाबाद १११ धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे टीम इंडियाने २०१२ आणि २०१८ च्या अंतिम सामन्यात दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय.

पृथ्वी शॉ – २०१८

टीम इंडियाने पुन्हा ६ वर्षांनी अंडर-१९ वर्ल्ड कप मुंबईकर पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. हा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यात आला होता.

Image result for u 19 world cup 2018 win team india

ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियाला विजयासाठी २१७ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने विजय मिळवला होता.

टीम इंडियाची फायनल मॅच खेळण्याची ही ७ वी वेळ होती. टीम इंडियाचा तिसऱ्या वेळेस अंतिम सामन्यात पराभव झाला आहे.

तर २ वेळा टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.

दरम्यान या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेने टीम इंडियाने अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. यामध्ये मोहम्मद कैफ, युवराज सिंह, विराट कोहली, रविंद्र जडेजा, उनमुक्त चंद, पृथ्वी शॉ, शिखर धवन ही काही उदाहारणं आहेत.

यांच्याशिवाय अनेक खेळाडू या स्पर्धेने टीम इंडियाच्या सीनिअर टीमला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.