Tue. Jun 18th, 2019

मुंबईत धारावीमध्ये इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

9Shares

मुंबईतील धारावीच्या पीएमजीपी कॉलनीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेचं नेमकं कारण काय?

मुंबईत धारावी पीएमजीपी कॉलनीमध्ये रविवारी रात्री बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळला.

रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

या इमारतीचा काही भाग खालून जात असलेल्या रिक्षावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

बाईकवरुन जाणाऱ्या एक व्यक्तीसह तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळं इमारतीचा भाग कोसळली आहे असं सांगण्यात येत आहे.

जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

9Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *