Wed. Jun 16th, 2021

दुष्काळामुळे ‘सासू-सुनेची विहीर’ आली पाण्याबाहेर

हजारो वर्षांचा पौराणिक महत्व असलेली जगविख्यात लोणार सरोवरातील सासू -सुनेच्या नावाने प्रचलित असलेली विहीर पुन्हा एकदा तब्बल 19 वर्षांनंतर पाण्याबाहेर आलीय. सततच्या वाढत्या तापमानामुळे  सरोवराचे पाणी आटत असल्यामुळे ही विहीर आता पूर्णपणे बाहेर आली आहे

का म्हणतात हिला सासू सुनेची विहीर?

ज्याप्रकारे सासू- सुनेचं नातं थोडं गोड थोडं खारट असतं, तसंच या विहिरीतील अर्धं पाणी गोड तर अर्धं पाणी खारं असतं.

नेहमी सरोवराच्या पाण्याच्या खाली ही विहीर असते.

त्यामुळे ही विहीर दिसत नाही.

पण आता ही विहीर दिसू लागलीय.

सरोवराच्या पायथ्याशी पौराणिक महत्व असलेल्या कमळजा माता मंदिराच्या एकदम समोर ही विहीर आहे.

हजारो वर्षांपासून ही विहीर इथे अस्तित्वात आहे.

जगविख्यात लोणार सरोवराच्या पायथ्याशी असलेले कमळजा मातेच्या मंदिरात यात्रेच्या वेळी या विहिरीतील गोड पाणी यात्रेकरूंची तहान भागवत असे, असे जाणकार सांगतात.

संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी, पण या विहिरीत मात्र अर्धं पाणी गोड असणं हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे.

ही विहीर बाहेर येण्याचं कारण हे सध्या होत असलेलं बाष्पीभवन, ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलतं हवामान यांमुळे कमी होणारं पाणी हे आहे.

1972 मध्ये दुष्काळ पडल्यावर पहिल्यांदा जेव्हा हे सरोवर कोरडं झालं होतं, तेव्हा ही विहीर दिसली होती.

 

19 वर्षांपूर्वीदेखील ही विहीर पाण्याबाहेर आली होती.

आता पुन्हा ही विहीर पाण्याबाहेर आली आहे.

सततच्या वाढलेल्या तापमानामुळे सरोवराचे पाणी आटू लागलंय. त्यामुळे ही विहीर बाहेर आली. मात्र हे पाणीही झपाट्याने कमी होतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *