Sat. Aug 13th, 2022

ऑटोमोबाईल हबमधील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

देशांतर्गत ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे औरंगाबादमधील ऑटोमोबाईल हब कोलमडू लागलाय. दुचाकी, तीनचाकी आणि चार चाकी वाहन उद्योजकांनी उत्पादन कमी केल्याने त्याचा फटका लहान व मध्यम उद्योजकांना बसतोय. वाळूज, शेंद्रा MIDC मधील अनेक लहान आणि मध्यम उद्योगांनी कंत्राटी कामगारांना कमी केलंय. तर काहींनी कामाच्या शिफ्ट कमी केल्यात. त्यामुळे कामगारांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात कपात झालीय.

औरंगाबादमधील वाळुज, शेंद्रा एमआयडीसी ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते.

या औद्योगिक वसाहतीमध्ये दुचाकी तीनचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी स्पेअर पार्ट बनवले जातात.

या हबला ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आलेल्या मंदीचा फटका बसू लागलाय.

सध्याच्या ऑटोमोबाईल हब मधील कामगारांना 20% टक्के फटका बसला, तरी दिवाळीनंतर मात्र मोठ्या प्रमाणात कामगार कपात होण्याची शक्यता उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात 60 ते 70 टक्क्यापेक्षा अधिक उद्योग ऑटोमोबाईल क्षेत्रावर अवलंबून आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात बजाजने गेल्या तीन महिन्यांपासून दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे उत्पादन 18 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्याने मध्यम व लघु उद्योजगाकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय.

 

बजाज           ऑगस्ट महिन्यातील उत्पादनात कपात

वाळूज (औरंगाबाद)             4 टक्के

चाकण     ( पुणे)                  1 टक्का

पंतनगर (उत्तराखंड)               13 टक्के

एकूण                                    6 टक्के

 

मंदीचं कारण

केंद्र सरकारने बीएस 6 प्रणाली येत्या 1 एप्रिल 2020 पासून लागू केली आहे.

त्यामुळे बी एस 6 या श्रेणीतील वाहने उद्योजकांना बाजारात बाजारपेठ आणायची आहेत.

ई व्हेइकल्स बाजारपेठेत येणार आहेत, त्यामुळे ग्राहकांनी नवीन गाडी खरेदीकडे पाठ फिरवलीय.

केंद्र सरकारने उद्योगावर लावलेला GST हे देखील एक कारण आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळ हे देखील मंदीचं एक कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.