Fri. Sep 30th, 2022

राठोडांना मंत्रिपद देणं दुर्देवी – चित्रा वाघ

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला आहे. एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून संजय राठोड यांनी सुद्धा मंत्रीपदी शपथ घेतली आहे. आता भाजपमधूनच त्यांच्या मंत्रिपदावरून टीका होऊ लागली आहे. महाविकास आघाडीत संजय राठोड हे वनमंत्री होते. मात्र, बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.

पूजा चव्हाण प्रकरणात मृत्यूला संजय राठोड कारणीभूत असल्याची टीका भाजप महिला प्रदेशउपाध्यक्ष चित्र वाघ यांनी केली होती. हा विषय वाघ यांनी जोरात लावून धरला होता. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी यावर आक्षेप घेतला आहे. आणि, आपला संजय राठोड यांच्या विरोधातील लढा सुरुचं ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

चित्र वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आपल्या  पोस्टमध्ये म्हणतात, ‘पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे. अशी पोस्ट चित्र वाघ यांनी लिहली आहे. त्यामुळे चित्र वाघ या पुढील काळात संजय राठोड यांच्या विरोधात काय पाऊल उचलतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.