पश्चिम बंगाल मतदानादरम्यान हिंसाचार, एकाचा मृत्यू

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदानाला आज सकाळ पासून सुरूवात झाली असून पश्चिम बंगालच्या 5 मतदारसंघात आज मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्यातल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मुर्शिदाबाद जिल्हातील बालिग्राम मध्ये तृणमूल कॉग्रेस आणि कॉग्रेस कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली.यामध्ये मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभा असलेला एक मतदार ठार झाला आहे. सकाळी तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकण्यात आला आहेय. यामध्ये तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.

मुर्शीदाबाद येथील एका मतदान केंद्राजवळचं  काही अज्ञात लोकांनी हातबॉम्ब फेकल्याचा प्रकार घडला आहे.

हातबॉम्ब फेकतानाचा हा  व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही अशी माहीती समोर आली आहे.

मतदारांना भीती दाखवण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत असा संशय  व्यक्त करण्यात येत आहे.

मुर्शिदाबाद येथे  बालीग्राम मध्ये मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या हाणामारीत  मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

तसेच दक्षीण दीनापूर जिल्ह्यातील बुनियादपूर येथे एका पोलिंग एजंटचा मृतदेह आढळून आला आहे.

Exit mobile version