Tue. Dec 7th, 2021

अर्थसंकल्प सादर; अर्थसंकल्पातील ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी 2.0 सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार कार्डला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलवर 1 टक्के सरचार्ज वाढवले तर सोन्यावरची कस्टम ड्यूटी वाढवणार आहेत. तसेच 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे –

पायभूत सुविधा, डिजीटल अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीवर भर देणार.

निरोगी आणि सुदृढ देशासाठी काम करणार.

मालवाहतुकीसाठी जलमार्गावर भर देणार आहे.

उडान उपक्रमाद्वारे लहान शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचे उद्धिष्ट.

वीज पुरवण्यासाठी वन नेशन, वन ग्रीड योजना.

ई-वाहनांचा वापर वाढवणार.

5 ट्रिलियन इकोनॉमी करण्याचे सरकाराचे लक्ष्य.

केंद्र सरकारच्या जमिनीवर मोठे प्रकल्प उभारण्यात येतील.

लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन करणार.

तरूणांना उद्योगासाठी त्वरीत कर्ज उपलब्ध करून देणार.

सेबीच्या निगराणीखाली सोशल स्टॉक एक्सचेंजचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मीडिया, हवाई क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवणार.

3 कोटी दुकानदारांना पेन्शन योजना.

ग्रामीण भागात 1.95 घरं बांधण्याचा प्रस्ताव.

भारताला दरवर्षी 20 लाख कोटी गुंतवणुकीची गरज.

विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक.

7 कोटी LPG कनेक्शन दिले.

बांबू, मध, खादी उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणार.

गंगा नदीतून मालवाहतूक 4 वर्षातून 4 पट वाढवणार.

सर्व भारतीयांना स्वच्छ पाणी आणि पेयजल देण्याचे उद्दिष्ट.

झीरो फार्मिंग बजेटवर लक्ष.

रस्ते बांधणीसाठी 5 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जाईल.

रस्ते बांधण्यासाठी 80250 कोटींचा निधी पुरवण्यात येईल.

अन्नदात्याला उर्जादाता बनवणार.

दुग्ध उत्पादन वाढवलं जाईल.

डेअरी कामांना प्रोत्साहन देण्यात येईल.

खेलो इंडिया योजनेचा विस्तार करणार.

नवीन शैक्षणिक धोरण आणणार.

उच्च शिक्षण संस्थेसाठी 400 कोटी देणार.

परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया योजना.

फक्त स्टार्ट-अपसाठी वेगळं व्यासपीठ उभारणार.

1,2,5,10 रुपयांचं नाणं नव्या रुपात.

लवकरच 20 रुपयाचं नाणं चलनात येणार.

5 लाखांचं उत्पन्न करमुक्त.

प्रामाणिक करदात्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार.

45 लाखांपेक्षा जास्त गृहकर्जावर 1.5 लाखांपर्यंतची सवलत.

पॅन कार्ड नसेल तर आधार कार्डवर मिळेल गृहकर्ज.

2013-14 मध्ये 6.38 लाख कोटी करवसुली.

2018 मध्ये 11.37 लाख कोटी करवसुली.

सोन्यावरची कस्टम ड्यूटी वाढवणार.

साडे तीन लाखांच्या लोनवर कर नाही.

श्रीमंतांना जास्त कर द्यावा लागणार.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *