Wednesday, April 22, 2026 11:49:01 PM

Maharashtra Budget 2026: महिला दिनापूर्वीच सरकारची महिलांना खास भेट! लाडकी बहीण ते लखपदी दीदीपर्यंत केल्या मोठ्या घोषणा

8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

maharashtra budget 2026 महिला दिनापूर्वीच सरकारची महिलांना खास भेट लाडकी बहीण ते लखपदी दीदीपर्यंत केल्या मोठ्या घोषणा

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत. 8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत. 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा त्यांनी केली.

हेही वाचा - Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या स्मृतींना सरकारकडून मोठा सन्मान; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि भव्य स्मारकाची घोषणा 

त्याचप्रमाणे, लखपती दीदी योजना ही ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येते.ही सरकारची महिला सक्षमीकरणाची प्रमुख योजना आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही या योजनेला आणखी विस्तार देण्यात आला होता. विशेष म्हणजे ग्रामीण महिलांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देणं, त्या वाढवणं आणि या योजनेचा कणा असलेल्या गटांना अधिक बळकटी देणं हे या मागचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिवणकाम, प्लंबिंग, एलईडी बल्ब उत्पादनापासून ते ड्रोन ऑपरेशनपर्यंत विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जातं.


सम्बन्धित सामग्री