नागरिकत्वासाठी राहुल गांधींना केंद्रीय गृहमंत्रालयाची नोटीस

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल केल्यावर आता ते स्वत: टीकेचे लक्ष्य बनले आहेत. भारतीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. स्वामी यांच्या तक्रारीनंतर राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणायाठी राहुल यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये असा नागरिकात्वाच्या मुद्द्यामुळे केला जाणऱ्या आरोपामुळे राहुल गांधींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका अपक्ष उमेदवाराने त्यांच्या भारतीयत्वावर प्रश्न निर्माण केले होते.
राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर हल्लाबोल
उमेदवारी अर्ज भरताना अमेठीमधील एका अपक्ष उमेदवाराने काँग्रेस अध्यक्ष यांच्या नागरिकात्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकला होता.
त्यांच्या या आरोपानंतर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हा आरोप लावून धरला.
निवडणुक आयोगाने जरी राहुल यांच्या उमेदवारी अर्जाला वैध ठरवलं असलं, तरी त्यांच्या या नागरिकत्वाचा प्रश्न सोडवता आलेला नाही.
‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीच्या कागदपत्रांवर राहुल गांधींच्या नावाला ब्रिटनचे नागरिकत्व जोडलेले आहे.
त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीचे भारतीय नागरिकत्व असणे, बेकायदेशीर आहे.
यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
असे असताना आता यासंबंधी राहुल गांधी त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण देतील, याकडे राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगत आहे.