Sun. Sep 19th, 2021

भाजपा नेत्याची घसरली जीभ,प्रियंका गांधींचा ‘असा’ उल्लेख!

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामळे सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांमवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.यातचं केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी राहूल गांधी यांचा पप्पू तर प्रियंका गांधी यांचा ‘पप्पी’ असा  उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महेश शर्मा यांच्यावर टीका होत आहे. महेश शर्मा बोलत असतानाचा  व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. सिकंदराबाद येथे आयोजित एका सभेत महेश शर्मा बोलत होते.

काय म्हणाले महेश शर्मा ?

‘संसदेत राहुल गांधींनी डोळा मारलेलं पाहून मी देखील घायाळ झालो होतो.

आता पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचंय आणि आता तर पप्पूची पप्पीदेखील आली आहे.

मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे’, असं वक्तव्य महेश शर्मा यांनी केलं आहे.

‘प्रियंका गांधी याआधी देशाची मुलगी नव्हती का? काँग्रेसची मुलगी नव्हती का ?अशी कोणती नवी गोष्ट त्या करणार आहेत.

‘जर ममता बॅनर्जी  कथ्थक नाचू लागल्या आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी गाणं गाऊ लागले तर कोण त्यांचं ऐकणार असं महेश शर्मां म्हटलं आहे.

यांना मजबूत सरकार नको असून दुर्बळ सरकार हवं असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *