Mon. Jan 17th, 2022

तीर्थयात्रेला जायचं असल्यामुळे यंदा निवडणूक लढणार नाही- उमा भारती

केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थयात्रेला जायचं असल्यामुळे आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलंय.

तीर्थयात्रेमुळे निवडणुकीला ‘राम राम’!

50 वर्षीय उमा भारती या मे महिन्यापासून तीर्थयात्रेला जाणार आहेत.

पुढील 18 महिने त्या गंगा नदीवरील तीर्थक्षेत्रांवर जाणार आहेत.

त्यामुळे 5 मे पर्यंत आपण निवडणूक प्रचार करणार आहोत, मात्र त्यानंतर तीर्थयात्रेला निघणार आहोत.

पुढील दीड वर्षं गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आपण काम करणार आहोत.

निवडणुका न लढण्याचा निर्णय आपण 2016 सालीच घेतला होता.

जर आपण निवडणूक लढवली असती, तर झाँशीमधूनच लढवली असती.

झाँशीमधील लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. ते मला मुलीप्रमाणे मानतात.

2024 मध्ये पुन्हा निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा नेत्रदीपक यश मिळवू.

BJPने आपल्याला खूप काही दिलं आहे.

BJPचं अध्यक्षपद वगळता बहुतेक सर्वच संस्थात्मक जबाबदाऱ्यांचं आपण निर्वहन केलं आहे.

त्यामुळे 5 मे पर्यंत रामलाल यांच्यासाठी आपण प्रचार करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *