Sat. Jul 4th, 2020

महाविद्यालयात मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची अनोखी शपथ

दिवसेंदिवस प्रेमप्रकरणात वाढ होत आहे. तर हुंडा घेण्याची पद्धत सुद्धा वाढली आहे. यात मुलीचे नुकसान होते व त्यांचं आयुष्य बरबाद होते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींंनी मुलींनी चक्क व्हॅलेंटाईनडेच्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह व हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ घेतली आहे.

त्यामुळे मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमरावतीच्या मुलींचा आदर्श घेण्याची गरज आहे. शाळा,कॉलेज व महाविद्यालयीन जीवनात मुला-मुलींचे प्रेमप्रकरणाचे सूत जुळते व याच प्रेमप्रकरणाचे रूपांतर लग्नात होते.

मात्र, या प्रेमप्रकरणात अनेक दुर्दैवी घटना अलीकडे घडल्या आहेत. प्रेमप्रकरणात अनेक मुलींचा संसार उघड्यावर आला असेही पाहायला मिळाला आहे. तर याच प्रेमप्रकरणात मुलींचा खून देखील झाला आहे.

या प्रेमप्रकरणात लग्न होत असल्याने आई वडिलांच्या लपून व त्यांचा याला विरोध असूनही प्रेमविवाह करतात. मात्र यात जन्मदात्या आई-वडिलांना विसरून हे सर्व प्रकार प्रेमाच्या धुंदीत होतात नंतर याचे अनेक परिणाम होतात.

रोज प्रेमप्रकरणात होत असलेला अत्याचार खून यावर मात करण्यासाठी अमरावतीच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरात मुलींनी हात समोर ठेवत हिंगणघाट घटनेतील पीडितेला श्रद्धांजली दिली. तसेच महाविद्यालयीन तरुणींनी प्रेम,प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची  शपथ घेतली.

एकीकडे १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनडे प्रेमाचा दिवस असताना त्यांच्या पूर्वसंध्येला मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली असल्याने या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींचा आदर्श घेण्याजोगा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *