महिला पोलिसावर अज्ञाताकडून फायरिंग

महिला पोलीसावर अज्ञाताकडून गोळीबार केल्याची घटना समोर येत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका अज्ञाताने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर फायरिंग केली.
सिद्धावा जायभाये या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत.
अज्ञाताकडून करण्यात आलेल्या सिद्धावा जायभाये या सुदैवाने बचावल्या.
सिद्धावा जायभाये या घरी जात असताना नोव्हेल्टी हॉटेल जवळ कामानिमित्ताने गाडी थांबवून उतरल्या. यादरम्यान एका इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिथे आला.
त्या इसमाने जायभाये यांच्यावर एक राउंड फायर केले. दुसरा राऊंड फायर करणार इतक्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड फेकून मारला.
यावेळेस त्याने तिथून धूम ठोकली.
मास्क लावलेला तसेच फुल्ल रेड ब्लॅक जाकीट या इसमाने घातलं होत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान हल्लेखोर नेमके कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत.