11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असा झाला खुलासा

बार्शीतील मजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार संतापजनक घटना समोर आली आहे. अनैसर्गित लैंगिक अत्याचार करून धमकवल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 च्या कलम 4 व 6 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या 377 आणि 506 कलमानुसार बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसा झाला खुलासा?

11 वर्षांच्या पीडित मुलाला शेजारीच राहणाऱ्या अकबर अमीर शेख वय 21 वर्षीय मुलाने माझ्यासाठी ‘दूध घेऊन ये, तुला पैसे देतो’ या बहाण्याने पीडित मुलाला घरात बोलवालं. त्यानंतर पीडिताचे आणि स्वतःचे कपडे काढून अनैसर्गिक अत्याचार केले.

त्यानंतर पीडितास कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली.

घाबरलेल्या मुलाने कुणाकडेच घटनेची वाच्यता केली नाही.

मात्र मुलाला जेवायला नीट बसता येत नसल्याचं आईच्या लक्षात आलं.

त्यावेळी आई आणि वडिलांनी त्याची विचारपूस केली.

अखेर पीडित मुलाने घडलेला प्रकार सांगितला.

ही घडलेली घटना ऐकून वडिलांनी अत्याचार करणाऱ्या विरुद्ध फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास पीएसआय जायपत्रे हे करीत आहेत.

Exit mobile version