Thu. Sep 16th, 2021

उन्नाव बलात्कार प्रकरणी पीडीतेचे पत्र सरन्यायाधीशांना पोहोचलंच नाही.

उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. पीडित मुलीने 12 जुलै रोजी सरन्यायाधीशांना पत्र पाठवलं होतं.
मात्र हे पत्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही.

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेत पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडितेचे नातेवाईकांचा मृत्यू झाला असून तिचे वकील देखील अपघातात गंभीर जखमी आहेत. हा अपघात आहे की घातपात याची अशी चर्चा सुरू असताना पीडीतेने सरन्यायाधीशांना दिलेले पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेत भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असल्याची तक्रार पीडीतीने केली होती.

यानंतर बलात्काराच्या घटनेतील पीडितेला न्यायासाठी अनेक गोष्टींना सामोर जावं लागलं आहे. काहूी दिवसांपूर्वी पीडीतेचा अपघात झाला.

या अपघातात पीडितेच्या काकू आणि अन्य एका नातेवाईक मृत्यूमुखी पडले. तर पीडीत तरुणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात नसल्याचा संशय पीडितेच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.

या उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. पीडित मुलीने 12 जुलै रोजी सरन्यायाधीशांना पत्र पाठवलं होतं.

मात्र हे पत्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रजिस्ट्रारांकडून उत्तर मागीतले आहे. असे गोगोई यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *