Thu. May 6th, 2021

पोलिसांनी भररस्त्यात तरुण-तरुणीला घातली गोळी; जाणून घेऊया या व्हिडिओ मागचं सत्य?

सोशल मीडियावर रोजच्याला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल, याबाबत काहीच सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) उत्तर प्रदेश पोलिसाच्या एका अधिकाऱ्यावर पहिल्यांदा एक तरुण आणि त्यानंतर त्याच्या मैत्रिणीवर गोळी झाडण्याचा आरोप केला जात आहे. शिवाय हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की लोक हे सत्य असल्याचं मानू लागले आहेत. आता या व्हिडिओच्या मागच काय सत्य आहे हे उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल श्रीवास्तव यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी लिहलं ‘या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. ते म्हणाले की फॅक्ट चेक केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ हरियाणातील करनाल येथेतील फ्रेंड्स कॅफेबाहेर शूट केलेल्या वेब सीरिजचा भाग आहे. व्यवस्थापकांनी याला दुजोरा दिला आहे. खरं पाहता या व्हिडिओचा चुकीचा उपयोग केला जात आहे.’

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि पोलिसांमध्ये जोरदार भांडणं होतात. ज्यानंतर पोलीस तरुणाला धक्का देतो. पोलीस आपली बंदूक काढतो आणि तरुणाच्या छातीत गोळी झाडतो. यानंतर त्याच्यासोबत असलेली मैत्रिण रडू लागते शिवाय पोलीसाला शिवीगाळ करते आणि तरुणाच्या शेजारी जाऊन बसते. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसणारा पोलीस तिच्यावरही गोळी झाडतो. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका ट्वीटमध्ये सोशल मीडियावरील वापरकर्त्यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. अनेकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर प्रदेश पोलिसांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र
फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *