Jaimaharashtra news

उत्तर प्रदेशात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच

जय महाराष्ट्र न्यूज, कानपूर

 

उत्तर प्रदेशमधील रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच खतौली येथे उत्कल एक्स्प्रेसचा अपघात झाला होता.

बुधवारी पहाटे आणखी एक रेल्वे अपघाताची दुर्घटना घडली आहे.

 

 उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसची डंपरला धडक झाल्याने 10 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले आहेत.

 

जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात

झाला होता. अद्यापपर्यंत या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Exit mobile version