Sun. Oct 24th, 2021

राज्यसभेत महिला मार्शलला धक्काबुक्की

बुधवारी संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर ‘माझ्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही घडताना मी पाहिलं नाही’, असं म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. या घटनेविरोधात आज काँग्रेसकडून दिल्लीमध्ये निदर्शनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं राज्यसभेत त्या वेळी काय घडलं? याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना बुधवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली होती. पेगॅसस आणि कृषी विधेयकांप्रमाणेच अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी वेलमध्ये उतरून कागद फाडून भिरकावले. तसेच, अनेक विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी मार्शल्सकरवी एक कडंच राज्यसभेत उभं करण्यात आलं. या प्रकारावरून सरकरावर विरोधकांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीका केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *