यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालं असून नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. शिवाय,रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असताना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखील २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. त्यामुळे २७ जून रोजी होणारी परीक्षा ही आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मे रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती, त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version