Tue. Jan 28th, 2020

उर्मिला मातोंडकरचा कॉंग्रेसला राम राम

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई येथून उमेदवारी दिली होती. मात्र उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमधून राजीनामा दिला आहे. पक्षांर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे उर्मिलाने सांगितले आहे.

उर्मिला मातोंडकरचा कॉंग्रेसला राम राम –

लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली.

मात्र भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला पराभूत केले.

उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसला राजीनामा देत राम राम केले आहे.

पक्षांकर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे उर्मिला मातोंडकरने सांगितले.

16 मे रोजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पाठवलेल्या पत्रावर कारवाई झाली नसून पत्र मुद्दाम मीडियामध्ये शेअर केल्याचा आरोप लावला आहे.

तसेच अनेकदा तक्रार केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने राजीनामा दिल्याचे उर्मिलाने सांगितले.

त्याचबोरबर राजीनामा दिल्यानंतरही लोकांसाठी काम करणार असल्याचे उर्मिला म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *