Thu. Apr 18th, 2019

उर्मिला मातोंडकर शरद पवारांच्या भेटीला

0Shares

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमधून उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उर्मिला मातोंडकरने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.  उर्मिला मातोंडकरने शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

उर्मिला आणि शरद पवार यांच्यात भेट –

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कॉंग्रेसमधून उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर केली.

सध्या उर्मिला प्रचार करण्यामध्ये व्यस्त असून ती राजकीय नेत्यांची भेट घेताना दिसत आहे.

आज उर्मिलाने शरद पवार यांची भेट घेतली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते आहे.

त्यांच्यामध्ये जवळ-जवळ अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच त्यांच्यामध्ये राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते आहे.

उत्तर मुंबईतून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलाची टक्कर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *