Sun. Jun 20th, 2021

काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात सहकार्य न केल्याने माझा पराभव झाला – उर्मिला मातोंडकर

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. पण यामध्ये उर्मिला मातोंडकरचा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. पण यामध्ये उर्मिला मातोंडकरचा पराभव झाला. निवडणुकीतील उर्मिला मातोंडकर काँग्रेस कार्यकर्त्यांवर फोडलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना नऊ पानांचं पत्र लिहून उर्मिलानं याबाबत तक्रार केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणूकीतील पराभवाचं खापर उर्मिला मातोंडकरनं काँग्रेस कार्यकर्त्यांवर फोडलं आहे. कार्यकर्त्यांनी प्रचारात आपल्याला सहकार्य केलं नसल्याची तक्रार उर्मिलानं केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना नऊ पानांचं पत्र लिहून उर्मिलानं याबाबत तक्रार केली. या कार्यकर्त्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

मतदानानंतर निकालाच्या आधी उर्मिलानं हे पत्र लिहीलंय. आपण ही निवडणूक गांभिऱ्यानं लढलो, पण उत्तर मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अजिबात गांभिऱ्यानं घेतली नाही असं उर्मिलानं पत्रात लिहीलं आहे.

मुंबई काँग्रेसमधील काही पदाधिाकाऱ्यांचे वयक्तीक हेवेदावे, राजकिय अपरिपक्वता यामुळं प्रचाराच्या काळात गोंधळ निर्माण झाला, त्याचा पक्षाच्या समान्य कार्यकर्त्यांवर परिणाम झाला, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मध्यवर्ती कार्यालयाची जागा अपूरी होती, त्याच साधनं पुरेशी नव्हती, मतदार संघात स्थानिक पातळीवर छोटी कार्यालयं तयार केलीच नाही, प्रचार साहित्याचं योग्य वाटप झालं नाही, परिणामी मतदारांपर्यंत आपले पत्र पोहोचले नाही.

प्रचारसभा, पदयात्रा वेळेत सुरु झाल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी उर्मिलानं या पत्रातून मांडल्यात. हे पत्र सर्वत्र व्हायरल झाला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *