Wed. Aug 21st, 2019

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

18Shares

 

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर असल्यामुळे राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त आहेत. राजकीय नेत्यांसह कलाकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. कॉंग्रेसने संजय निरुपम यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन हटवून उत्तर पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कॉंग्रेसमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे समजते आहे. मात्र कॉंग्रेसने अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा केली नसून ही फक्त चर्चा असल्याचे समजते आहे.

कॉंग्रेसकडून उत्तर मुंबईतून कोण ?

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त आहेत.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना अध्यपदावरुन उचलबांगडी करत उत्तर पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र कॉंग्रेसचे स्थानिक नेते उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही.

तसेच उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला असल्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक नेते इच्छुक नसल्याचे समजते आहे.

त्यामुळे कुठल्यातरी कलाकाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत कॉंग्रेस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासाठी अनेक कलाकारांच्या नावांचा विचार करण्यात आला असून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

मात्र कॉंग्रेसने अद्याप याबद्दल घोषणा केली नसून ही फक्त चर्चा असल्याचे समजते आहे.

 

 

 

18Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *