Tue. Feb 25th, 2020

अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडल्यामुळे प्रयोग यशस्वी झाला – संभाजी भिडे

अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

काय म्हणाले संभाजी भिडे?

भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

“भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे” असं म्हणत त्यांनी कालमापन पध्दतीचे कौतुक केले आहे. नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात दुर्गामाता दौडही आयोजित केली गेली आहे. अशी माहितीही यावेळी संभाजी भिडे यांनी दिली आहे.

अमेरिकेने आत्तापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं  तेव्हा नासाच्या एका वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. ज्यामुळे अमेरिकेची मोहीम यशस्वी झाली. असा दावा त्यांनी केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *