Sun. Sep 19th, 2021

अमेरिकेकडून चीनला कडक इशारा

जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून चीनने वाचवले आहे. चीनने वीटोचा वापर केल्याने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे भारताचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

आता अमेरिकेनेही चीनला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

चीनच्या अशा धोरणाने संयुक्त राष्ट्रातील इतर सदस्य देशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागेल.

जर चीन दहशतवादासंदर्भात गंभीर असेल, तर त्यानं पाकिस्तान आणि इतर देशांतील दहशतवाद्यांचा बचाव करू नये.

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले की, चीनने चौथ्यांदा असे केले आहे.

चीनने सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियेत अडचणी आणणं योग्य नाही.

चीन असाच वारंवार दहशतवादावर कारवाई करण्यापासून इतर देशांना रोखत राहिल्यास सुरक्षा परिषदेकडे इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *