Thu. Apr 22nd, 2021

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चांना रंगत असून कोण होणार नवे राष्ट्रध्यक्ष?

अमेरिकेच्या राष्ट्रपदी निवडणुक लढवण्यासाठी रिपल्बिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होत आहे. सध्या स्थितीला डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर आहे तर जो बायडन आघाडीवर आहे. जो बायडन यांचा विजय मानला जात आहे मात्र डोनाल्ड ट्रम्प पराभवाच्या वाटेवर असताना देखील हार पत्कारण्यास तयार नाही.  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाला आहे आणि पोस्टल मतदानात पारदर्शकता नाही त्यामुळे पुन्हा मतमोजणी करावी अशी मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे.  जो बायडन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती पदाचा दावा करू नये, मी देखील असा दावा करू शकतो. याबाबतची कायदेशीर कारवाई देखील चालु झाली आहे. असं ट्विट करून ट्रम्प ह्यांनी बाईडन ह्यांच्यावर निशाणा साधला.अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्थानासाठी निवडणूकीमध्ये 538 पैकी 270 इलेक्टोरेल मत मिळवणं गरजेचं आहे. तेव्हाच व्हाईट हाऊसवर सत्ता मिळवणं शक्य असते. जो बायडन यांनी पेन्सिलवेनिया आणि जॉर्जियामधे आघाडीवर आहेत. पेन्सिलवेनियामधे जो बायडन नऊ हजार मतांसोबत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. बायडन यांचं भवितव्य ठरवण्यासाठी पेन्सिलवेनिया आणि त्यांचे 20 इलेक्टोरेल व्होट्स बायडेन यांना 270 बहुमत मिळवून देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *