Tue. Oct 26th, 2021

#USOpen : भारतीय सुमित नागलची फेडररला कडवी झुंज!

US Open 2019 ची पहिलीच मॅच आणि तीसुद्धा टेनिसचा बादशहा रॉजर फेडररच्या विरोधात… अशी परिस्थिती असेल तर भल्याभल्यांना घाम फुटेल… पण भारताच्या सुमित नागलने बलाढ्य़ फेडररला जबरदस्त झुंज देत सगळ्यांचीच वाहवा मिऴवली. सुमितला फेडररसमोर खेळताना पराभव पत्करावा लागला खरा, पण सुमितच्या धाडसी खेळाचं सगळ्यांनीच कौतुक केलंय.  पहिलाच सेट सुमितने 6-4 असा जिंकत जबरदस्त सुरूवात केली.

पण फेडररने सामन्य़ात पुनरागमन करताना पुढचे तीनही सेट जिंकत सामना 4-6, 6-1, 6-2, 6-4 असा खिशात घातला.

जागतिक क्रमवारीत 3 नंबरवर असणाऱ्या Roger Federer सारख्या बलाढ्य टेनिस प्लेयरपुढे सुमित नागल पहिल्यांदाच टेनिस कोर्टात खेळत होता. तरीही फेडररला त्याने चांगलंच झुंजवलं.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या फेडररविरुद्धचा पहिला सेट जिंकून सुमितने दमदार सुरुवात केली.

फेडररसारख्या मोठ्या आणि ताकदीच्या खेळाडूपुढे ग्रँडस्लॅमचा पहिलाच सामना खेळणं म्हणजे खरंतर मोठंच आव्हान होतं.

तरीही अतिशय आत्मविश्वासाने न घाबरता सुमितने खेळ सुरू केला.

पहिला सेट जेव्हा सुमितने जिंकला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

फेडरर हा सामना सहज जिंकेल, असंच वाटत होतं. मात्र तरीही सुमितने त्याला चांगलंच झुंजवलं.

नंतरच्या सेटमध्ये जरी फेडररने सरशी करत भारतीय सुमितचा पराभव केला असला, तरी सुमितने त्याच्यापुढे उभं केलेलं आव्हान भल्याभल्यांच्या चर्चेचा विषय ठरलंय. नेटिझन्सही सुमितच्या गेमवर खुश आहेत. सध्या सुमित नागल सोशल मीडियावरही ट्रेण्डिंगमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *