Fri. Sep 17th, 2021

कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानला आमेरिकेचा इशारा!

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरलंय. भारताशी असणारे व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत. तसंच राजनैतिक संबंध कमी करण्याचाही निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. भारताचे उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्याचा इशारा दिलाय, तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावून घेण्यात आलंय.

समझौता एक्सप्रेसलादेखील ब्रेक लावण्यात येतोय. एवढंच नव्हे, तर पाकिस्तानच्या संसदेत भारतावर हल्ला करण्याचीही भाषा करण्यात आली.

पुलवामासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता पाकिस्तानने बोलून दाखवली.

अमेरिका, चीन आणि इतर इस्लामिक राष्ट्रांना पाकिस्तानने या विषयावर सहाय्य करण्याचं आवाहन केलं.

मात्र अमेरिकेने पाकिस्तानला संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

अमेरिकेचे सिनेटर रॉबर्ट मेनेंडझ आणि अमेरिकन काँग्रेसमन एलएट एंगल यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये पाकिस्तानलाच आक्रमक न होण्याचा सल्ला दिला आहे.

तसंच LOC वरून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सांगण्यात आलं.

काश्मीरमध्ये 370 कलम हटवणं हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचं मान्य केलं, तरी जम्मू कश्मीरच्या विभाजनाच्या निर्णयाकडे अमेरिकेचं लक्ष असल्याचंही म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *