Sun. Jun 20th, 2021

अमेरिकेत १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनावरील लस सापडल्यानंतर अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण देखील सुरू आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची लस देण्यास परवानगी दिली आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर-बायोटेकच्या कोरोना लसीच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. कोरोना लस वापरण्याचा हा निर्णय आम्हाला पुन्हा सर्वसाधारण स्थितीत घेऊन जाईल, अशी आशा एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकॉक यांनी व्यक्त केली आहे.

फायझर कंपनीला आढळले की त्यांची लस लहान मुलांवर चांगले काम करते. त्यानंतर एका महिन्यानंतर ही घोषणा करण्यात आली. फायजर लसीचे दोन डोस आता १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरण्याला परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *