Tue. Oct 26th, 2021

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला 14 जूनला एक वर्षं पूर्ण झालं होतं. याप्रकरणी अजूनही तपास सुरू आहे. या प्रकरणावर आणखी वेगवेगळे खुलासे होतांना दिसत आहे. सध्याच्या घडीला एका मुलाखतीद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) यांनी सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. उषा नाडकर्णी यांनी प्रसिद्ध हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये सुशांतसोबत काम केले होते. या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. या मुलाखतीमध्ये उषा यांनी सुशांतसोबत असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितले. उषा यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, ‘सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. तसेच यानंतर काय करायचं असे प्लॅनही त्याचे होते. असा असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार’. पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग वेळी सुशांत 23-24 वर्षांचा होता. यावेळी तो उषा यांच्या सोबत सेटवर गप्पा मारत असायचा. पवित्र रिश्ता मालिकेची आठवण सांगताना उषा म्हणाल्या, ‘आम्ही सेटवर भेटायचो,बोलायचो. तो फारच मोकळा होता. सतत काहीतरी वाचत असायचा. त्यावेळी मला आठवतं. त्याला बांद्र्यात फ्लॅट घ्यायचा होता. त्याची किंमत होती दोन कोटी रूपये. मला म्हणाला, ताई मला बांद्रा येथे फ्लॅट घ्यायचा आहे. मी त्याला विचारलं, अरे तू इतके पैसे कसे कमावणार. तर मला म्हणाला, करेंगे ताई. तो हसतमुख होता. या इंडस्ट्रीत येऊन काय करायचं हे त्यानं ठरवलं होतं.असा मुलगा आत्महत्या कशी करेल? माझ्या मनाला ते पटत नाही. माझं मन सांगतं त्याची हत्याच झाली असणार. नाहीतर मला सांगा, गेल्या वर्षभरापासून त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे. अजून काहीच कसं का हाती लागलेलं नाही? पोलिसांपासून भारतातल्या मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा या कामात लागल्या आहेत. वर्ष झालं तरी सुशांतचं नेमकंं काय झालं ते यांना कळलेलं नाही? मग तपासही लागत नसेल तर मग काहीतरी काळंबेरं असणार आहे असं वाटू लागतं. आणि तसं का वाटू नये? ‘ मुलाखतीमध्ये उषा यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या हेअर ड्रेसरने सुशांतच्या मृत्यूची बातमी त्यांना सांगितली तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. सुशांतचा 14 जून 2020 रोजी कार्टर रोडवरच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळला. गेल्या वर्षभरापासून सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. याप्रकरणी या एका वर्षात अनेक खुलासे झाले. आता नेमकं याप्रकरणी काय होणार हा येणार काळच सांगेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *