Jaimaharashtra news

#USOpen : नादालची पुन्हा विजेतेपदाला गवसणी

अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनियल मेदवेदेव (Medvedev) याचा पराभव करत राफाएल नादाल (Nadal) याने पुरूष एकेरीचं विजेतेपद जिंकलं. नादालचं हे 19वं ग्रँडस्लॅम (Grandslam) आहे.

5 तास रंगलेल्या या फायनल सामन्यात स्पेनच्या राफाएल नादालने 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा डॅनियल मेदेवदेवचा पराभव केला.

नादालने 27 व्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. अमेरिकन ओपन त्याने 2010, 2013 आणि 2017 मध्ये जिंकला होता.

मेदवेदेव ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या फायनल फेरीत पोहोचणारा 2005 नंतरचा पहिला रशियन पुरूष ठरलाय.

Exit mobile version