Tue. Dec 7th, 2021

उत्तर प्रदेशममध्ये बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली. या जखमींना लाला लजपतराय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

‘दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती’,अशी माहिती कानपूरचे पोलीस निरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. जखमींपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असून हे कामगार टेम्पोने कामासाठी जात असतानाच हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच दोन पोलीस स्थानकातील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून या प्रकरणात तातडीने मदत करण्याचे आणि जखमींवर उपचारासंदर्भातील निर्देश त्यांनी दिले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *