उत्तरप्रदेश निवडणूक मतदानाचा सहावा टप्पा गुरुवारी

उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून उत्तरप्रदेश निवडणूक मतदानाचा सहावा टप्पा गुरुवारी पार पडणार आहे. भाजपसाठी हा टप्पा निर्णायक असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य ठरणार आहे.
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात ५७ मतदारसंघात मतदान होणार असून अनेक पक्षांची कसोटी निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात लागणार आहे. उत्तरप्रदेशात ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
सहाव्या टप्प्यात कुठे मतदान होत आहे?
गोरखपूर, आंबेडकरनगर, बलिया, बलरामपूर, बस्ती, देवराईया, कुशीनगर, महाराजगंज, संत कबीरनगर, सिद्धार्थनगर या जिल्ह्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होईल. ६७६ उमेदवार या मतदारसंघांमध्ये रिंगणात आहेत.