Wed. Jun 29th, 2022

उत्तरप्रदेशात सातव्या टप्प्यातले मतदान पार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले असून ५४ जागांसाठी सोमवारी मतदान पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा सातवा टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यामुळे आता उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीत बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  वाराणसी आणि अखिलेश यादव यांच्या लोकसभा मतदान क्षेत्रात मतदान पार पडले असून २ कोटींपेक्षा जास्त मतदार ६१३ उमेदवारांच्या भवितव्यांच्या करणार निर्णय ठरणार आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे

निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मोदींचा धुव्वाधार प्रचार

वाराणसी आणि शेजारी जिल्ह्यात प्रचार

अखिलेश यादव यांच्या सोबत ममतांचा वाराणसीत प्रचार

प्रियांका यांचा राहुल गांधी यांच्यासोबत वाराणसीत प्रचार

बीसीएसपी प्रमुख मायावती यांनीही केला प्रचार

लखीमपूर घटनेत मृत्यू पावलेल्या चार शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत

विरोधी पक्षांनी प्रचारात जोर दिला लखीमपूर हिंसेवर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील २०१७ आणि २०२२ मधील मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा २०१७ – ६३.४७%    २०२२ – ६२.४३%


दुसरा टप्पा २०१७ – ६५.५३ %    २०२२ –  ६४.६६%


तिसरा टप्पा २०१७ – ६२.२१%     २०२२ – ६२.२८%


चौथा टप्पा २०१७ – ६२.५५%      २०२२ – ६२.७६%


पाचवा टप्पा २०१७ – ५८.२४ %   २०२२ – ५८.३५%


सहावा टप्पा २०१७ – ५६.५२ %   २०२२ – ५६.४३%


सातवा टप्पा ५४.०० %


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.