Jaimaharashtra news

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद सुरुच

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद अद्याप मिटताना दिसत नाही.

काल (दि.6 मार्च) गोंधळ आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण करण्यात आले.

हे नाव चुकीचे असून ही बाब विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही. असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी केला आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ हे नाव , ऐतिहासिक दस्तावेजानुसार चुकीचे आहे.असे उत्पात यांचे मत आहे.

विद्यापीठाने आणि सरकारने असे चुकीचे नाव देत अर्थाचा अनर्थ कसा केला, असा सवालही त्यांनी केला.

याबाबत आमदार गणपतराव देशमुख आणि अभ्यासक आण्णा डांगे यांच्याशी चर्चा केली असून आतातरी विद्यापीठाने ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विद्यापीठाच्या नावात नेमकं काय चुकलंय?

सुरुवातीला लिंगायत समाजाने यास आक्षेप घेत सिद्धेश्वर असे नामकरण करण्याची मागणी केली होती.

सोलापूर विद्यापीठाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे.

विद्यापीठाला दिलेले हे नाव चुकीचे असल्याचा दावा ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी केला आहे.

‘अहिल्या’ असा केलेला उल्लेख पूर्ण चुकीचा असून, ऐतिहासिक दस्तावेजात अहल्या असे नाव आहे.

अहिल्याचा अर्थ आहि म्हणजे साप आणि ला म्हणजे आणणारी म्हणजेच साप आणणारी असा नावाचा अनर्थ होत असून, खरे नाव ‘अहल्या’ आहे.असे उत्पात यांचे म्हणणं आहे.

खरे नाव ‘अहल्या’ असून याचा अर्थ सूर्यप्रकाश पसरवणारी थोर शक्ती असा आहे.

माधवराव पेशव्यांच्या पत्रात देखील गंगा जल समान मातोश्री पुण्यश्लोकी अहल्याबाई असा उल्लेख आढळतो, अशी माहिती उत्पात यांनी दिली आहे.

नामकरणात वापरलेले पुण्यश्लोक हा पुल्लिंगी असून त्याऐवजी पुण्यश्लोकी असायला हवे असे त्यांनी सांगितले

 

 

 

 

Exit mobile version