Fri. Oct 7th, 2022

गुगल डूडलच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचं आवाहन

भारतामध्ये आज तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू होत आहे. भारत सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार आजपासून भारतात १८ वर्षांवरील सर्वजण लसीकरण मोहिमेत सहभागी होऊ शकणार आहेत. ‘लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि जीव वाचवा’ अशी साद आता गूगलकडून देखील घालण्यात आली आहे. आज गूगलच्या होम पेजवर गुगल डूडलच्या माध्यमातून कोरोनाची लस घ्या असं आवाहन करण्यात आले आहे.

लसीसोबतच मास्क घालणं देखील गरजेचे आहे ही गरज ओळखून गूगलने डूडलमध्ये प्रत्येक अक्षरावर मास्क घातला आहे. या अ‍ॅनिमेटेड गूगल डूडलवर सर्वजण लसीकरणानंतरचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.भारतात ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकार तर १८-४४ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा कार्यक्रम राज्य सरकार कडून केला जाणार आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन भारतीय बनावटीच्या लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर रशियाची स्फुटनिक वी ही देखील येत्या काही दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी लसीकरणासाठी बाहेर पडावं आणि कोरोनाची लस टोचून घ्यावी यासाठी आवाहन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.