Thu. Sep 23rd, 2021

मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरण सुरु

मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरु झाले आहे . मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु .सध्या मुंबईत १ लाख ३५ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे ४०-५० हजार डोस मुंबईकरांना दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे १५ हजार डोस दररोज दिले जातात.
मागच्या काही दिवसांपासून लस तुटवड्यामुळे मुंबईत सरकारी केंद्रांवरील लसीकरण बंद होते. पण आता लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आजपासून सरकार आणि महापालिकेच्या ३०० केंद्रांवर लसीकरण मोहिम सुरु होणार आहे.
लस तुटवड्यामुळे शुक्रवारपासून मुंबईत ३०० केंद्रांवर लसीकरण बंद होते. यापूर्वी १ जुलैला याच कारणासाठी लसीकरण थांबवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *