Sun. Sep 19th, 2021

मुंबईमध्ये गुरुवारी सुद्धा लसीकरण बंद

मुंबईमध्ये गुरुवारी लसीकरण बंद .लसीचा साठा उपलब्ध नसल्या कारणाने गुरुवारी मुंबईमध्ये सरकारी तसेच पालिका क्षेत्रातील केंद्रावर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहेत . मागील काही दिवसात आपण पाहिल तर मुंबईमध्ये दर दिवशी लाखाच्या पुढे लसीकरण होत आहेत . परंतु अचानक हा साठा उपलब्ध नसल्या कारणाने आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. बऱ्याच नागरिकांना या विषयी माहिती नसल्याने विशेष करून युवावर्ग लसीकरण केंद्रावर येऊन परत जात आहेत.

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईच्या नागरिकांना माहिती दिली जाईल. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईच्या नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईच नाही तर अनेक ठिकाण लसीच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. कल्याण-डोंबिवलीत तर सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण २५ लसीकरण केंद्रे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लसींचा साठा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्याने आठवड्यातून सरासरी दोन दिवस ही केंद्र बंद असतात. गेल्या आठवडाभरापासून लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने मंगळवार आणि बुधवारी पालिकेची २५ लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी लसीचा साठा प्राप्त न झाल्याने गुरुवारी देखील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *