Sat. Jul 31st, 2021

मंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन, वडेट्टीवार का गैरहजर?

महाराष्ट्रात ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) आल्यावरही अनेक दिवस खातेवाटप काही झालंच नाही. खातेवाटपातही राष्ट्रवादी काँग्रेसनेच सर्व महत्त्वाची खाती मिळवली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील मंत्र्यांना अपेक्षित खाती न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी दिसून येते. काँग्रेसच्या नाराज नेत्यांमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपली नाराजी विशेष अधिवेशनादरम्यानही दिसून आली.

नाराज वडेट्टीवार आज 8 जानेवारी रोजी अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासंदर्भात बोलावलेल्या विशेष अधिवेशनालाही गैरहजर होते.

गेल्या दोन दिवसांपासून वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून (Congress) सातत्याने होतोय. मात्र अद्यापही ते नाराज असल्याचीच चर्चा आहे.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात केंद्रानं पारीत केलेल्या अनुसूचित जाती-जमातींना दिलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यावर विधिमंडळात शिक्‍कामोर्तब झालं आहे. एकमताने हा प्रस्ताव संमत झाला.

विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री काय म्हणाले?

हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोणा एका जातीपुरते हे विधेयक नाही

उपेक्षित वर्गाला न्याय दिला पाहिजे.

देश म्हणजे आपल्या देशातील माणसे

जो व्यथा वेदना भोगतो तोच त्या समाजाच्या वेदना मांडू शकतो, त्यांना वाचा फोडू शकतो..

बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाची स्थिती लक्षात घेऊन आरक्षण दिले होते.

जे काही लोक दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांना समान संधी मिळावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि या विधेयकाला संमती द्यावी

एखाद्या समाजाला तोच न्याय देऊ शकतो, ज्याने या वेदना भोगल्या आहेत.

घोषणा केलेल्या योजना राबविण्यासाठी त्या त्या वर्गाचे प्रतिनिधी सोबत असणं गरजेचं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *